Dehu gaon : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूगावातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवारी (दि.9) साजरा होणार आहे. बिज कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहूनगरीत दाखल होतात. (Dehu gaon) या सोहळ्यानिमित्त देहूगावातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत. देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग) येथून देहूगावकडे येणारा रस्ता बंद असेल.

या मार्गावरील वाहतूक भक्ती शक्ती चौक, त्रिवेणीनगर, तळवडे गावठाण, कॅनबे चौक, खंडेलवाल चौक, देहूगाव या मार्गावरून जाईल. महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सू कॉर्नर अथवा कॅनबे चौक, आयटी पार्क चौक हा रस्ता चाकणकडून येणाऱ्या वाहनांसाठी बंद राहील. तो फक्त तळवडे, आयटी पार्क, महिंद्रा सर्कल असा वनवे करण्यात येईल. यासाठी पर्यायी मार्ग महिंद्रा सर्कल ते निघोजे व मोईफाटा मार्गे डायमंड चौक हा वापरता येईल. तळेगाव-चाकण रोडवरील देहूफाटा येथून देहूगावकडे जाणाऱ्या मार्गावर जड वाहतूक बंद राहील.

Maharashtra : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

या मार्गावरील वाहने एचपी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता बंद राहील. (Dehu gaon) वरील मार्गावरील वाहतूक मंगळवार (दि. 7) दुपारी बारा ते गुरुवारी (दि. 9) रात्री नऊ पर्यंत राहील. तर गुरुवारी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत महिंद्रा सर्कल ते आयटी चौक रोड हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.