Hinjawadi : मालाच्या गाड्या खाली करण्यासाठी खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मालाच्या गाड्या खाली करण्यासाठी प्रत्येक (Hinjawadi) गाडीमागे 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 6) दुपारी सुस येथे एका बांधकाम साईटवर घडला.

रवींद्र वाघू तुपे (वय 46, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश ससार (रा. सुस, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुस येथील एका बांधकाम साईटवर येणाऱ्या बांधकाम साहित्याच्या गाड्या खाली करण्यासाठी प्रत्येक गाडीमागे 50 हजार रुपये देण्याची दिनेश याने मागणी केली. बांधकाम साईटवरील स्टोअर इनचार्ज, कामगार, वाहन चालक आणि क्लिनर यांना दिनेश याने जीवे मारण्याची धमकी देत आरडाओरडा करून (Hinjawadi) दहशत निर्माण केली. शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.