Chikhali : चिखलीमधील सोसायट्यांमध्ये विविध विकासकामांना सुरुवात; स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

एमपीसी न्यूज – चिखलीमधील दोन सोसायट्यांमध्ये नुकताच विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून ही कामे केली जात आहेत. दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी मागणी केली. त्या मागणीची पूर्तता आमदार महेश लांडगे यांनी तात्काळ केली. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

चिखली प्राधिकरण येथील पोलाईट सोसायटी आणि अंजनी गाथा फेज एक या दोन सोसायट्यांमध्ये विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे, अंजनीगाथा सोसायटीचे संदीप केदारी, विजय पाटील, अमोल झिरमुटे, धनसिंग गाडे, सुखदेव खोत, हिमांशू कानेसागर, पोलाईट सोसायटीचे प्रदीप पाटील, किरण गायकवाड, महेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

अंजनीगाथा हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोसायटीमध्ये ओपन जिम उभारण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन शनिवारी (दि. 31) महेश लांडगे यांच्याकडे देण्यात आले. आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मागणीचा तात्काळ विचार करून एका दिवसात ओपन जिमसाठी होकार दिला. केवळ होकारच दिला नसून रविवारी (दि. 1) सोसायटीमधील ओपन जिमचे उद्घाटन देखील केले. अंजनीगाथा सोसायटीमध्ये सुमारे सव्वादोनशे सदनिका आहेत. या ओपन जिममध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना व्यायाम करता येणार आहे.

चिखली प्राधिकरण येथील पोलाईट सोसायटीयेथे पेविंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आज (रविवारी) करण्यात आला. पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण सोसायटीमध्ये पेविंग ब्लॉक बसवून पूर्ण होणार आहेत. सदृढ समाजासह स्वच्छ समाजाच्या निर्मितीसाठी आमदार महेश लांडगे नेहमी आग्रही आहेत. यातूनच त्यांनी नागरिकांच्या हाकेला साद देत विविध कामांचा शुभारंभ केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.