Sangli News : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार!

एमपीसी न्यूज : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये  शाईफेक करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करणार्‍या कार्यकर्त्याची(Sangli News) सांगलीमध्ये 23 डिसेंबर रोजी हत्तीवरून मिरवणुक काढून जाहीर सत्कार करण्याचा निर्णय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दिली. याबाबत सामनामध्ये बातमी प्रसिध्द करण्यात आली आहे.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाउराव पाटील यांच्या अतुलनीय शैक्षणिक कार्याबद्दल अपशब्द वापरणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे समता दलाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून निषेध केला. या घटनेमुळे मूलतत्ववादी विचारांना लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला असून शाई फेक करणारे मनोज गडबडे व या घटनेचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची सांगलीत 23 डिसेंबर रोजी हत्तीवरून मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.याबाबत सामनामध्ये बातमी प्रसिध्द करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही मिरवणुक सुरू होणार असून लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे.यानंतर जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

MPC News Podcast 14 December 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

गडबडे, वाकडे याच्याबरोबरच विक्रम होवाळ, आकाश इजद यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार असल्याचे प्रा.कांबळे यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे नियोजन (Sangli News) करण्यासाठी आज सांगलीत बैठक पार पडली. या बैठकीस नंदकुमार भंडारे, संदीप ठोंबरे, वीरू फाळके, अशोक वायदंडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.