Talegaon News : भाजपातर्फे तळेगावात उत्तर भारतीय नागरिक स्नेह आणि सत्कार संमेलन

एमपीसी न्यूज देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या एक भारत-श्रेष्ठ भारत संकल्पनेला केंद्रबिंदू मानून  भारतीय जनता पार्टी तळेगांव दाभाडे (Talegaon News) शहर उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अंशु पाठक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित उत्तर भारतीय नागरिक स्नेह आणि सत्कार संमेलन रविवारी (दि.11) पार पडले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक  बाळासाहेब_दादा_जांभूळकर,उपाध्यक्ष उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश नवीन_सिंग,उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश बिहार प्रकोष्ठ संयोजक जितेंद्र सिंग हे उपस्थित होते. तसेच या माजी नगरसेविका शोभा भेगडे,महिला मोर्चा कार्याध्यक्षा अश्विनी काकडे,शहर उपाध्यक्ष सुधीर खांबेटे,संजय जाधव, सोशल मिडीया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम,ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितिन पोटे,कार्याध्यक्ष सचिन जाधव,व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष सागर शर्मा,कामगार मोर्चा कार्याध्यक्ष स्वप्नील भेगडे,सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष गणेश उंडे,महिला मोर्चा सरचिटणीस मीना भेगडे,प्रसिद्धीप्रमुख सोनाली शेलार,विष्णू गुंजाळ.जयराम डावखर,कामगार आघाडी उपाध्यक्ष .सतिश पारगे,सरचिटणीस आनंद पूर्णपात्रे,प्रज्ञा आघाडी अध्यक्ष पद्मनाभ पुराणिक आणि पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी,शहरातील मोर्चा/आघाडी पदाधिकारी- कार्यकर्ते व उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी दिपपूजन,भारतमाता पूजन करून झाली. या कार्यक्रमात माजी आमदार स्व.दिगंबरदादा भेगडे,उत्तर भारतीय आघाडी कार्याध्यक्ष मनीष तिवारी यांचे (Talegaon News)वडील स्व.अवधेश नारायण तिवारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अंशू कुमार प्रेम (पाठक) यांनी केले.

Sangli News : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार!

याबरोबरच लोकसभा प्रवास योजना महाराष्ट्र संयोजक,माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे,मुख्य अतिथी संजय उपाध्याय,भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय परिषद सदस्या व Gem पोर्टलच्या प्रभारी उषा वाजपेयी,भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष उमाशंकर सिंह यांची भाषणे झाली.

यानंतर तळेगावसह मावळमध्ये योगदान देत असलेल्या यशस्वी उद्योजक इंदर ओसवाल, यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामसिंग रावत,डॉ. सुदीप कुमार  (Md /medicine), उद्योजक व छट पूजा समिती, तळेगाव दाभाडे कमलेश तिवारी, तसेच वैज्ञानिक डॉ. सुशील झा,

सामादिक कार्यकर्ते राजेश यादव, ज्येष्ठ व्यापारी भीमशेठ अगरवाल, छत्तीस कौम राजस्थानी मंडळ अध्यक्ष.शैतान सिंह खिर्ची, पूर्व वायुसेना अधिकारी प्रियरंजन सिंह, (Talegaon News) देहूरोड गुरुद्वारा प्रबंधक समिती गुरमीतसिंह रत्तू, यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये तळेगाव दाभाडे शहर उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्षपदी पोर्णिमा उपाध्याय यांना आणि सचिव,उत्तर भारतीय मोर्चा पदी मोहरसिंह राजपूत यांना नियुक्त करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनशहर उपाध्यक्ष.हिम्मत पुरोहित(प्रभारी,उत्तर भारतीय आघाडी),महिला मोर्चा अध्यक्षा तनुजा भेगडे,पोर्णिमा उपाध्याय उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्ष,उपाध्यक्ष पल्लवी गवारे,युवा मोर्चा अध्यक्ष शिवांकुर खेर,कामगार मोर्चा सदस्य राजेंद्र डांगे,ज्येष्ठ आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक,सरचिटणीस दिलीप सुतार,.वालावलकर काका, विजय पंडीत,उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणीचे उपाध्यक्ष पवन शुक्ला,सचिव.पंडित यादव,सदस्य चंदन मिश्रा,सदस्य के.आर.प्रसाद, सदस्य विनोद उपाध्याय,सदस्य लोकेश विश्वकर्मा,सदस्य यमुनाशाह,सदस्य अब्दुल सलमान यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन तळेगांव दाभाडे शहर भाजपा सरचिटणीस विनायक भेगडे व.रवींद्र साबळे,कामगार मोर्चा अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी केले.(Talegaon News) तर आभार प्रदर्शन उत्तर भारतीय आघाडी उपाध्यक्ष पवन शुक्ला यांनी केले.सोशल मीडिया कार्याध्यक्ष सचिन भिडे यांच्या संपूर्ण वंदे मातरं ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.