Pune : आवडीच्या क्षेत्रात करिअर करून विकासाच्या संधी प्राप्त करा- यजुर्वेन्द्र महाजन

करिअर निवड आणि स्पर्धा परीक्षा यावर यजुर्वेन्द्र महाजन यांचे मार्गदर्शन

इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचे आयोजन

एमपीसी न्यूज- योग्य वेळी योग्य करिअर निवडल्यास त्याचा आयुष्यभर फायदा होतो. आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास विकासाच्या संधी गवसतात, याबाबत जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने पुणे येथील बीएमसीसी कॉलेज येथे या मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल, अर्जुन दलाल, महाविद्यालयाचे प्राचार्य सी एम रावल आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यजुर्वेन्द्र महाजन म्हणाले, “आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो. ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे. अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी. केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही, तर करिअर निवडल्यानंतर त्या क्षेत्रात अविरत निष्ठेने काम केल्यानंतरच यश मिळते. स्पर्धा परीक्षेतील स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. स्पर्धा परीक्षा देताना नियोजन करून अभ्यास करायला हवा, असा सल्ला देत अंध, अपंग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या निराधार विद्यार्थ्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी दीपस्तंभ प्रयत्नशील आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन देखील महाजन यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.