Pimpri News : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून मोशी येथील प्रस्तावित न्यायालयाच्या जागेची पाहणी

एमपीसी न्यूज : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे तसेच न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती ए. एस. डॉक्टर व पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश (Pimpri News) एस.सी. चांडक, न्यायाधीश शिंदे साहेब यांनी रविवारी मोशी बोऱ्हाडेवाडी येथील सेक्टर 14 मध्ये 6.57 हेक्टर जमिनीवर प्रस्तावित न्यायालयाच्या जागेची पाहणी केली. यावेळी पिंपरी-चिंचवड अँड बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अँड नाना रसाळ व कार्यकारणीच्या वतीने तिन्ही न्यायमूर्तींचे स्वागत करण्यात आले.

यावेळी न्यायमूर्ती साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देत जागेचा लेआऊट बांधकाम नकाशा पाहिला व त्याबाबत योग्य त्या सूचना देखील केल्या तसेच नेहरूनगर येथे न्यायालयाचे विस्तारीकरणांतर्गत तयार झालेल्या न्यायालयीन इमारतीचे पाहणी न्यायमूर्ती साहेबांनी करून उद्घाटना संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी बार असोसिएशनचे तर्फे काही सुचना देखील करण्यात आल्या व लवकरच उद्घाटन संदर्भात काही अंतिम पूर्तता झाल्यानंतर तारिख़ निश्चित करू असे न्यायमूर्ती साहेबांच्या वतीने आश्वस्त करण्यात आले. यावेळी पिंपरी मोरवाडी कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश  वानखेडे, न्या. श्री. गिरी साहेब, न्या श्री. मोरे साहेब, न्या श्रीमती फटाले मॅडम, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश अंकुश शिंदे

Pune News : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालकांचा संप अखेर मागे

महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, सह सचिव ॲड.मंगेश नढे , ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे सदस्य ॲड. प्रशांत बचूटे, सदस्य ॲड.अक्षय केदार, तसेच पिंपरी-चिंचवड अँड बार असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य ॲड.राजेंद्रजी उमापसर , (Pimpri News) पिं.चिं.ॲड.बार असोचे माजी अध्यक्ष ॲड.सुशील मंचरकर, पिं.चिं.ॲड.बार असोचे माजी अध्यक्ष ॲड.विलास कुटे, पिं.चिं.ॲड.बार असोचे माजी अध्यक्ष ॲड.राजेश पुणेकर, पिं.चिं.ॲड.बार असोचे माजी अध्यक्ष ॲड.दिनकर बारणे, महाराष्ट्र व गोवा नोटरी अध्यक्ष ॲड.अतिष लांडगे , पुणे बार असोशिएशनचे उपाध्यक्ष लक्ष्मणजी येळेसर , पिंपरी-चिंचवड महानगरपालिककेचे सर्व वरीष्ठ अधिकारी व इतर सन्मानीय सहकारी वकील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.