Pimpri News : महापालिका वैद्यकीय अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी संवर्गातील अधिका-यांच्या अंतर्गत 24 अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या वैद्यकीय अधिका-यांची बदली केली नाही. पण, आमच्या बदल्या केल्या असे खासगीत सांगत या बदल्यांवरुन वैद्यकीय अधिका-यांनी नाराजीचा सूर आवळलेला पाहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये 8 रुग्णालये आणि 28 दवाखाने कार्यरत आहेत. त्यापैकी वायसीएम हे 750 खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. महापालिका हद्दीबरोबरच नजीकच्या ग्रामीण भागातील रुग्णदेखील या रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात. वैद्यकीय विभागाकडील रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेच्या कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकारी संवर्गातील अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. हॉस्पिटल सक्षमीकरणासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचीही हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता टी तिरुमणी यांची जिजामाता रुग्णालयातून तालेरा रुग्णालयाचे प्रमुख, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडकर यांची तालेरा रुग्णालयातून आकुर्डी रुग्णालय प्रमुख, शहर क्षयरोग नियंत्रण विभागाचे कामकाजही त्यांच्याकडे दिले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अलवी सय्यद नासेर इब्राहिम यांची थेरगाव रुग्णालयातून जिजामाता रुग्णालय, पिंपरी वाघेरे दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाज, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके यांची तालेरा रुग्णालयातून यमुनानगर रुग्णालय प्रमुख, प्राधिकरण दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाजही त्यांच्याकडे असणार आहे.

ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे यांच्याकडे वैद्यकीय मुख्य कार्यालय आणि नवीन भोसरी रुग्णालयाची जबाबदारी सोपविली आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र मंडपे यांची सांगवी रुग्णालयातून थेरगाव रुग्णालय, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा खरात यांची यमुनानगर रुग्णालयातून थेरगाव रुग्णालय (स्त्रीरोग विभागाचे कामकाज), ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बांगर यांच्याकडे जिजामाता रुग्णालयातील भुलतज्ज्ञ विभागाचे कामकाज सोपविले आहे.

ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे यांची पिंपरी वाघेरे दवाखान्यातून जुने भोसरी रुग्णालय प्रमुख, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार यांची भोसरी रुग्णालयातून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (राष्ट्रीय कार्यक्रम), ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे यांची यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून सांगवी रुग्णालय, फुगेवाडी दवाखान्यातील उपनिबंधकाचे अतिरिक्त कामकाज दिले आहे.

ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे यांची आकुर्डी रुग्णालयातून जिजामाता रुग्णालयाच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली भामरे यांची जिजामाता रुग्णालयातून पिंपरी वाघेरे दवाखाना, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांची जिजामाता रुग्णालयातून प्राधिकरण दवाखाना, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता गायकवाड यांची यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून भोसरी रुग्णालय (स्त्रीरोग प्रसुती विभाग कामकाज), वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला पगारे यांची यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून भोसरी रुग्णालय (स्त्रीरोग प्रसुती विभाग कामकाज), वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना गांधी यांच्याकडे भोसरी रुग्णालयातील भुलतज्ज्ञ विभागाची जबाबदारी सोपविली आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता नांगरे यांची भोसरी रुग्णालयातून तालेरा रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल कराळे यांच्याकडे तालेरा रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसुती विभागाचे कामकाज सोपविले आहे.

भुलतज्ज्ञ डॉ. सुरेखा शिंदे यांच्याकडे तालेरा रुग्णालयातील भुलतज्ज्ञ विभागाची जबाबदारी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास बोरकर यांच्याकडे आकुर्डी रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसुती विभागाचे कामकाज दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरज तायडे यांची यमुनानगर रुग्णालयातून आकुर्डी रुग्णालयाच्या भुलतज्ज्ञ विभागात बदली केली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनीष सुर्यवंशी यांची तालेरा रुग्णालयातून जिजामाता रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसुती विभागाचे कामकाज सोपविले आहे.

तर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुजा पोसाणे यांच्याकडे भोसरी रुग्णालयाऐवजी थेरगाव रुग्णालयाच्या स्त्रीरोग प्रसुती विभागाचे कामकाज सोपविले आहे. दहा वर्षांपासून एकाचठिकाणी ठाण मांडून असलेल्या वैद्यकीय अधिका-यांची बदली केली नाही. पण, आमच्या बदल्या केल्या तसेच ‘ओमायक्रॉन’चे संकट असताना अचानक बदल्या केल्याने वैद्यकीय अधिका-यांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.