Pune : दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला चांगला प्रतिसाद

20 देशांतील 300 प्रतिनिधींचा सहभाग

एमपीसी न्यूज- वाय अ‍ॅण्ड एम अंजूमन खैरूल इस्लामच्या पूना कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स वतीने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला. 20 देशांतील 300 प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते.

या परिषदेत 200 लेखकांद्वारे लिखित 146 शोध पत्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही शोध पत्रे युजीसी (युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन) च्या यादीतील 5.5 सूचिबद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल ‘अंजांता’ मध्ये प्रकाशित केली गेली आहेत. 8 खंडात प्रकाशित झालेल्या या जर्नलचे प्रकाशन देखील या परिषदेत करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे क्वॅलिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅम च्या सहकार्याने कॉमर्स पोस्टग्रॅज्युएट अँड रिसर्च सेंटर द्वारे आयोजित ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद सेमिनार हॉलमध्ये झाली.

‘न्यू ट्रेंडस् इन कॉमर्स, इकॉनॉमिक्स, बँकींग, कोऑपरेशन, मॅनेजमेंट, कॉम्पुटर सायन्स, आय टी अ‍ॅण्ड एन्हार्यनमेंट’ हा परिषदेचा विषय होता.

डॉ. आब्बास लोखंडवाला (कॉमर्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर विभाग प्रमुख), नसरीन परवेज खान आणि वाफीया वाहिद यांनी परिषदेचे संयोजन केले. आयेशा काडीवाल आणि फैजा शेख यांनी सूत्रसंचालन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आफताब अन्वर शेख यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि प्रतिनिधींचे स्वागत केले. तसेच परिषदेचे महत्व आणि स्वरूप स्पष्ट केले.

वाणिज्य, अर्थशास्त्र, बँकिंग, सहकार, व्यवस्थापन, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रातील सर्वात प्रभावी आणि प्रचलित ट्रेंडचा आढावा घेणे, सर्वोत्तम पद्धतींचा सखोल अभ्यास करणे तसेच 20 देशांतील तज्ञ आणि प्रतिनिधींना एकत्र आणणे या प्रमुख हेतूने ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेत सहभागी देशांमध्ये ऑस्ट्रिया, जर्मनी, युनायटेड किंग्डम, थायलँड, रिपब्लिक ऑफ चाड, कॅमरून, दक्षिण आफ्रिका, आयव्हरी कोस्ट, तुर्कमानिस्तान, नायजेरिया, झांबिया, मोझांबिक, येमेन, बहरीन, श्रीलंका, रवांडा, इराक, इराण, अफगाणिस्तान या देशांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनिडा वडीचारोइन (थाई – नीचि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुआनुंग, बँकॉक) म्हणाले ‘ही परिषद विविध देशांना त्यांचे अनुभव आणि सवोत्तम पद्धती यांची देवाणघेवाण करण्यासाठी सक्षम ठरेल.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.