IPL 2023:लखनऊ सुपर जायंट्सने हैदराबादचा केला सुर्यास्त

शानदार विजयासह प्ले ऑफच्या आशा झाल्या पल्लवित.

एमपीएससीन्यूज:(विवेक कुलकर्णी)लखनऊ सुपर जायंट्सने हैदराबादचा केला मोठा पराभव

नवोदित प्रेरक मंकड आणि निकोलस पुरनच्या धडाकेबाज खेळीने लखनऊ संघाने हैदराबाद सनरायजर्सवर 7 गडी आणि चार चेंडू राखत मोठा पराभव करत (IPL 2023)अंकतालिकेतही चौथा क्रमांक पटकावला आहे.

आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातल्या आजच्या पहिल्या आणि एकूण 58 व्या सामन्याची लढत आज लखनऊ आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघात झाली ज्यात लखनऊ संघाने हैदराबाद संघाच्या 183 या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना केवळ 3 गडयाच्या बदल्यात केला.
आज सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावत 183 धावांचे सुरक्षित वाटणारे आव्हान लखनऊ संघाला दिले खरे पण या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाला फारसे कष्ट घ्यावे लागले असे वाटले नाही ,त्यांनी फक्त 3 च गडी गमावून हे लक्ष 20 व्या षटकाच्या आतच प्राप्त करुन अंकतालिकेतही चौथ्या क्रमांकावर विराजमान होत प्ले ऑफ साठी आपलाही दावा मजबूत (IPL 2023)केला आहे.

Pune : सिटीएफसी पुणे, राहुल एफए, एनडीए युथ स्पोर्टस क्लब, संगम बॉईज उपांत्यपूर्व फेरीत

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाची सुरुवात खराब झाली.अनमोलप्रीत सिंग आणि अभिषेक शर्मा या जोडीने डावाची सुरुवात केली खरी,पण अभिषेक शर्मा फक्त 7 धावा काढून युध्दवीरच्या गोलंदाजीवर बाद होवून तंबूत परतला.त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने पुढे खेळत अनमोलप्रीत बरोबर 37 धावांची भागीदारी केली,त्रिपाठी चांगला खेळत आहे असे वाटत असतानाच तो 13 चेंडूत 20 धावा करुन बाद झाला,त्यानंतर कर्णधार मार्करम ,हेन्रीक क्लासेन ,अनमोलप्रीत सिंग आणि समद यांच्या उपयुक्त फलंदाजी मुळे हैदराबाद संघाने आपल्या 20 षटकात 6 गडी गमावून 182 धावा केल्या. खरे तर या धावा 20-20 मध्ये नक्कीच कमी नव्हत्या, पण लखनऊ संघाने या लक्ष्याला सहज गाठताना फक्त 3 च गडी गमावून(IPL2023) गाठले.

 

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचव्या आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

खरे तर लखनऊ संघाची सुरुवात खराबच झाली.खतरनाक फलंदाज कायले मेयर स्वस्तात बाद झाल्यानंतर डिकोक आणि मंकड यांनी चांगली भागीदारी करत डाव सावरला. डीकॉक लय पकडत असतानाच मयंक मार्कन्डेच्या गोलंदाजीवर 29 धावा करून बाद झाला.त्यानंतर आलेल्या मार्कस स्टोयनिसने जबरदस्त टोलेबाजी करत 25 चेंडूत 40 धावा करत विजयाचा पाया रचला, याच आक्रमकतेच्या नादात तो बाद झाला,पण त्यानंतर आलेल्या निकोलस पुरनने जबरदस्त फलंदाजी करत हैदराबाद संघाच्या गोलंदाजांना दे माय धरणी ठाय असे केले,पूरनने केवळ 13 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत घणाघाती 44 नाबाद धावा करत संघाला सहज विजयी केले, मंकडनेही अतिशय शानदार खेळी करत आपल्या दुसऱ्याच सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. या पराभवाने हैदराबाद संघाला आता प्ले ऑफ साठी प्रचंड मेहनत आणि पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवूनही नेट रनरेट्सच्या भरोशावर अवलंबून रहावे लागणार आहे,तर या विजयाने लखनऊ संघाच्या प्ले ऑफ साठीच्या आशा बऱ्यापैकी पल्लवित झालेल्या (IPL 2023)आहेत.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद
6 बाद 182
अनमोलप्रीत सिंग 36,त्रिपाठी 20,मार्करम 28,क्लासेन 47,समद नाबाद 37
कृनाल पंड्या 24/1,यश ठाकूर 28/1
पराभूत विरुद्ध
लखनऊ सुपर जायंट्स
3 बाद 185
डीकॉक 29,स्टोयनिस 40,मंकड नाबाद 65,पुरन नाबाद 44
मार्कंडे 39/,1,शर्मा 42/1

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.