Congress : कर्नाटक विजयाचा पिंपरीत जल्लोष

एमपीसी न्यूज – कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा (Congress) एकहाती विजय झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने जल्लोष करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ढोल वाजवत, पेढे वाटत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याचे सांगितले.

शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, रिपब्लिकन सेना शहर निरीक्षक मुकुंद रणदिवे, महासचिव दत्ताभाऊ गायकवाड, झोपडपट्टी सेल अध्यक्ष राजू गायकवाड, रमेश कांबळे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, बाबू नायर, निगार बारस्कर, माजी शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहीतुले, उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सायली नढे, स्वाती शिंदे, डॉ. मनिषा गरुड, आशा भोसले, के हरिनारायण, बाबा बनसोडे, किरण नढे, माऊली मलशेट्टी, हरीश डोळस, जेवेअर अँथोनी, पांडुरंग जगताप, सतीश भोसले, आकाश शिंदे, विठ्ठल शिंदे, राजू ठोकळे, बीबी शिंदे, उमेश बनसोडे, भाऊसाहेब मुगुटमल, गौतम ओव्हाळ, किरण खाजेकर, मिलिंद फडतरे, फिरोज इनामदार, अर्जुन लांडगे आदी पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.

Chhajed Parivar Mandal : अ. भा. छाजेड परिवार मंडळातील वाद विकोपाला, अध्यक्ष बदलासाठी जोरदार मोर्चेबांधणी

कर्नाटकचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. ही निवडणूक आम्हीच जिंकणार अशा (Congress) अविर्भावात शतप्रतिशतवाल्यांनी मतदारांना गृहीत धरले होते. मात्र मतदारांना जास्त दिवस या भूलथापांना बळी पाडता येत नाही. हेच या निवडणुकीने दाखवून दिले. भ्रष्टाचार ,बेरोजगारी, महागाई यावर बोला हेच या निवडणुकीत मतदार सांगत आहे. हे भाजपने आता लक्षात घेतले पाहिजे, असे शहराध्यक्ष कदम म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.