Pune News : गोसेवा माध्यमातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली, गाईंसाठी 5 हजार किलो चा-याचे वाटप

एमपीसी न्यूज – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी जय गणेश व्यासपीठ पुणे यांच्या वतीने सासवड येथील श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवा संस्थेला 5 गणेश मंडळांच्या वतीने 5 हजार किलो हिरवा चारा देण्यात आला. यावेळी कन्हैया दुबे आणि विजया घुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या उपक्रमात बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, गुरुवार पेठेतील वीर शिवराज मित्र मंडळ, रविवार पेठेतील अखिल कापडगंज मंडळ, कोथरूड येथील श्री शनी मारुती बाल मंडळ आणि येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ही गणेश मंडळे सहभागी झाली होती. पीयूष शाह, सचिन पवार, किरण सोनिवाल, अमित जाधव, गोविंद तिवारी, संदीप जोशी, मोहित झांजले, जयेश शाह, सतीश नहार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पीयुष शाह म्हणाले, श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवा येथे भाकड गाई घेऊन दुभत्या गाई शेतकरी बांधवांना दिल्या जातात. तेथील दूध मुलांना मोफत दिले जाते. तसेच शेतकऱ्यांना शेणखत देखील विनामूल्य दिले जाते. बाबासाहेब पुरंदरे यांनी संपुर्ण जीवन इतिहास संशोधनात, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घराघरात अन् मनामनात पोहचवण्यासाठी जीवन व्यतीत केले. त्यांना अभिप्रेत असलेले गोधन सुरक्षा व गोपालन करणाऱ्या संस्थेला सहकार्य करण्याच्या भावनेने पुण्यातील गणेश मंडळांनी मिळून शिवयोगी पुरंदरे यांना आदरांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.