Pimpri News: ‘कर संकलन विभागात अनेक फायली पेडिंग, विभागप्रमुखांचे चार वर्षे पूर्ण, राज्य सेवेत पाठवा’ नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर आकारणी व कर संकलन विभागात अनेक फायली प्रलंबित आहेत. त्याचे कारण काय? त्यातून उत्पन्न मिळत नसल्याने फाईली प्रलंबित ठेवल्या आहेत का? त्या फाईली निकाली काढल्या तर महापालिकेचे 100 कोटीने उत्पन्न वाढेल. असे असतानाही फायली का प्रलंबित ठेवल्या आहेत. कर आकारणी विभागाच्या उपायुक्तांची काम करण्याची पद्धत अतिशय चुकीची आहे. त्यांचा प्रतिनियुक्तीवरील कालावधी संपला असून महापालिकेत चार वर्षे पूर्ण झाले. त्यांना तत्काळ राज्य सेवेत परत पाठवावे अशी मागणी सत्ताधारी भाजप नगरसेवक विकास डोळस यांनी सर्वसाधारण सभेत केली.

सर्वसाधारण सभेत बोलताना विकास डोळस म्हणाले, ”महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या अधिकारी प्रसिद्धीलोलूप आहेत. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या टाटा मोटर्स कंपनीला त्यांनी नोटीस दिली. पेपरबाजी केली. नाहक कंपनीला बदनाम केले. कर संकलन विभागात अनेक फायली प्रलंबित आहेत. त्याचे कारण काय? त्यातून उत्पन्न मिळत नसल्याने फाईली प्रलंबित ठेवल्या का?, त्या फाईली निकाली काढल्या तर महापालिकेचे 100 कोटीने उत्पन्न वाढेल. असे असतानाही फायली का प्रलंबित ठेवल्या आहेत”.

”कर आकारणी विभागाच्या प्रमुखांची काम करण्याची पद्धत अतिशय चुकीची आहे. त्यांना महापालिकेत चार वर्षे पूर्ण झाले. प्रतिनियुक्तीचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांना तत्काळ राज्य सेवेत परत पाठवावे. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले राज्य सेवेतील अधिकारी वेगळा हेतू ठेवून काम करतात. बायस पद्धतीने काम करतात. नगरसेवकांना मूर्ख समजतात”, असेही डोळस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर म्हणाले, ”अधिका-यांनी मालकी हक्क समजू नये. त्यांना आपण परत पाठवू शकतो. सभागृहाला त्याचा अधिकार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.