Jansanvad Sabha : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवारी सकाळी 10 ते 12 यावेळेत जनसंवाद सभा (Jansanvad Sabha) होणार आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

यामध्ये, उपआयुक्त तथा प्र. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, स्थापत्य उद्यान विभागाचे सहशहर अभियंता सतीश इंगळे, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी, आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांची अनुक्रमे अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत.

Pavana Dam : पवना धरण क्षेत्रात काल 0 मिमी पाऊस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.