Pavana Dam : पवना धरण क्षेत्रात काल 0 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज : पवना धरण क्षेत्रात (Pavana Dam) काल 0 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. पिंपरी – चिंचवड शहरासह मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरले आहे.

शनिवारी दिवसभरात सकाळी 6 वाजल्यापासून ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत 0 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच, आज सकाळपर्यंत एकूण 2295 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस 2180 मिमी होता. त्यामुळे 138 मिमी पाऊस यावर्षी आज पर्यंत जास्त झाला आहे. तसेच, आजचा पाणीसाठा 100 टक्के आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 99.14 टक्के होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 0.86 टक्के जास्त आहे.

पिंपरी चिंचवड शहारासह मावळ तालु्क्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्या स्रोत पवना धरण (Pavana Dam) आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहरला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बांधऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करून शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो.

पवना धरणातील परिस्थिती : Pavana Dam

गेल्या 24 तासात झालेला पाऊस : 0 मिमी.
1 जूनपासून झालेला पाऊस : 2295 मिमी.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस : 2180 मिमी.
धरणातील सध्याचा पाणीसाठा : 100.00 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा : 99.14 टक्के
गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ : 0.0 टक्के
आजची पाण्याची आवक: 0.42 द. ल. घ. मी
आजपर्यंत पाण्याची आवक: 291.39 द. ल. घ. मी
धरणतील पाण्याचा उपयुक्त पाणीसाठा : 240.97 द. ल. घ. मी
धरणतील पाण्याचा एकूण पाणीसाठा : 272.11 द. ल. घ. मी
धरणातील पाणी पातळी: 613.26 मीटर

Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त सलील कुलकर्णी साधणार संवाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.