Teacher’s Day : शिक्षक दिनानिमित्त सलील कुलकर्णी साधणार संवाद

एमपीसी न्यूज – शिक्षक दिनानिमित्त (Teacher’s Day) यंदा इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे ज्येष्ठ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 सप्टेंबर रोजी संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता हा दिमाखदार सोहोळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी माध्यमांना दिली. कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.

एक संवेदनशील लेखक, गायक, संगीतकार (Teacher’s Day) म्हणून नावाजलेले सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’ हा शिक्षण व्यवस्थेवर वेगळे भाष्य करणारा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला आहे. या माध्यमातून डॉ. कुलकर्णी विद्यार्थी, शिक्षक यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. या प्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत आपल्या कामाचा चांगला ठसा उमटविणाऱ्या काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि अन्य संस्था सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे प्राचार्य मलघे यांनी सांगितले.

Ganpati Visarjan Parking : पुण्यात विसर्जन मिरवणूक पहायला येताय…. मग येथे करा पार्कींग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.