Ganpati Visarjan Parking : पुण्यात विसर्जन मिरवणूक पहायला येताय…. मग येथे करा पार्कींग

एमपीसी न्यूज – एक वेळी मंदिराबाहेर हरवलेली चप्पल सापडेल पण गणेश विसर्जनादिवशी पार्कींग म्हणजे जरा कठीणच. विसर्जन मिरवणूकीसाठी (Ganpati Visarjan Parking) पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर अगदी देश परदेशातून देखील नागरिक सामील होतात. या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे शहरात पार्कींग वेळेवर मिळत नाही. या समस्येवर पुणे वाहतूक पोलिसांनी तोडगा काढला असून गोंधळ उडण्याआधीच शहरातील काही जागा या पार्कींगसाठी जाहीर केल्या आहेत. गणरायाच्या विसर्जनाप्रमाणे यामध्ये दोन टप्प्यात या जागा पार्किंगसाठी उपलब्ध असणार आहेत. त्या पुढिल प्रमाणे 

दि.4 ते 8 सप्टेंबर म्हणजे पाच ते सात दिवसाच्या गणरायाचे विसर्जन – यावेळी शहरात 19 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर (जे एम रोड), डेक्कन जिमखाना (झेड ब्रीज जवळ), मिलेनियम प्लाझा वाहनतळ (एफसी रोड), लँडमार्क वाहनतळ (शिरोळे रोड), प्रो.मे. यश एंटरप्रायजेस (एफसी रोड), सर्कस मैदान, न्यू.इंग्लीश स्कूल (रमणबाग), टिळक पुल ते भिडे पुल (नदी किनारी), बालभवनासमोर (सारसबाग रेड बजाज पुतळा ते सणस पुतळा चौक उजवी बाजू), हमालवाडा पार्कींग (नारायणपेठ), गोगटे प्रशाला (केळकर रोड), एस.पी. कॉलेज, मंगला टॉकीज, काँग्रेस भवन, मनपा भवन, सी.ओईपी ग्राऊंड, पुरम चौक ते हॉटेल विश्व (रस्त्याच्या डाव्या बाजूस), देसाई कॉलेज शविवार वाडा (केवळ पोलिसांच्या वाहनांसाठी राखीव)

Pimpri Chinchwad traffic : नऊ दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी पिंपरी चिंचवड वाहतुकीत बदल

तर 9 ते 10 सप्टेंबर रोजी 18 ठिकाणी पार्कींग व्यवस्था करण्यात (Ganpati Visarjan Parking) आली आहे. यामध्ये गरवारे कॉलेज, डेक्क्न एज्युकेशन सोसायटी, मंगला टॉकीज, काँग्रेस भवन, मनपा भवन, सी.ओईपी ग्राऊंड, हमालवाडा पार्कींग (नारायणपेठ), जयंतराव चिळक पुल ते भिडे पुल (नदीपात्रातील रस्ता), आय.एल.एस. लॉ. कॉलेज (लॉ कॉलेज रोड), संजीवनी हॉस्पीटल (कर्वेरोड), जैन हॉस्टेल (बी.एम.सी.सी रोड), गाडगीळ पुतळा ते कुंभारवाडा, फर्ग्युसन कॉलेज, आपटे प्रशाला (आपटे रोड), देसाई कॉलेज शनिवार वाडा (पोलिसांच्या वाहनांसाठी), पुरम चौक ते हॉटेल विश्व (रस्त्याच्या डाव्या बाजूस), न्यू.इंग्लीश स्कूल (टिळक रोड),बी.एम.सी.सी. कॉलेज.

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी वरील ठिकाणी आपले वाहन पार्क करून प्रशासनाला सहकार्य करावे व आपली गैर सोय टाळावी असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Gauri Pujan : माहेरवाशिणी आज घरोघरी पुजणार गौराई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.