Gauri Pujan : माहेरवाशिणी आज घरोघरी पुजणार गौराई

एमपीसी न्यूज : गणराय पाठोपाठ घरोघरी (Gauri Pujan) गौराई, महालक्ष्मींचे आगमन झाले आहे. ”महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी” म्हणत हळदी-कुंकूवाच्या थाटात ज्येष्ठा आणि कनिष्ठ गौरीचा गृहप्रवेश करण्यात आला. गौराईंना बसवण्यासाठी घरोघरी सुंदर सजावट करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी त्यांना नैवेद्य म्हणून भाजी-भाकरी आणि वरण भातचा नैवेद्य देण्यात आला.

आज गौरी पूजन होणार आहे. काल गौराईचे आगमन, शृंगार सजावट पार पडली. आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. तर कोकणात गणरायांच्या गणासाठी मटण वड्यांचा नैवेद्य असणार आहे. आज कोकणवासीयांच्या श्रावण सुटणार आहे.

सप्तमीला अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मीचे आगमन होते. असे मानले जाते, की महालक्ष्मी आपल्या मुलांसह ज्येष्ठ-कनिष्ठ रूपात तीन दिवस तिच्या माहेरी येते. घटस्थापनेनंतर पहिल्या दिवशी विवाहित महिला एकत्र येतात. दुसऱ्या दिवशी महानैवेद्य लावला जातो. यात 16 प्रकारचे गोड पदार्थ, 16 प्रकारच्या भाज्या आणि विविध भोगांचा समावेश आहे. तिसर्‍या दिवशी त्यांना सुख आणि समृद्धीची शुभेच्छा देऊन निरोप दिला जातो.

महाराष्ट्रात जिल्हा बदलला कि प्रथा (Gauri Pujan) बदलतात. महाराष्ट्रात गौरींच्या पूजेच्या पद्धती आणि परंपरा प्रांतप्रांतात वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी केवळ गौरीचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात.

काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात.

आजच्या दिवशी कोकणात ओवसा करतात. माहेरवाशिणी फळांचे सूप घेऊन गौरीची पूजा करते. काही ठिकाणी कुमारिका हि पूजा करतात. असे मानले जाते, कि महालक्ष्मी हि माहेरी येते, त्यामुळे हा सण माहेरवाशिणींचा सण मानला जातो.

MPC News Online Bappa Part 6 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 6)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.