Chakan Water Supply : पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांत संताप

एमपीसी न्यूज : चाकणमधील पाणीपुरवठा (Chakan Water supply) विस्कळीत झाला आहे. याबाबत चाकण विकास मंचच्या वतीने चाकण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून , तातडीने उपययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

चाकण शहरातील अनेक प्रभागात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. चाकणमधील सर्वच प्रभागात मोठ्या संखेने नागरिक वास्तव्यास आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असताना शहरासाठी जुनीच सुमारे ३० वर्ष जुनी पाणीपुरवठा योजना आहे. त्यामुळे पूर्ण दाबाने आणि दररोज पाणीपुरवठा होतच नसल्याची स्थिती आहे. त्यातच तांत्रिक अडचणी आल्यास सलग पाच-पाच दिवस पाणी मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अन्यथा आंदोलनाचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.

याबाबत चाकण विकास मंचच्या वतीने (Chakan Water supply) चाकण पालिकेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे, माजी उपसरपंच साजिद सिकीलकर, चाकण सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे, उपाध्यक्ष दतात्रेय गोरे, राम गोरे, निलेश कड यांच्यासह नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी संतप्त भावना व्यक्त करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले कि, काही दिवसांपासून अनेक प्रभागात नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहेत. प्रशासनाने यावर तातडीने उपयोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चाकण पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी सांगितले कि, वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. एक्स्प्रेस फिडरची मागणी वीज वितरणकडे करण्यात आली आहे. त्यानंतर हि समस्या काही अंशी कमी होईल.

World Vulture Day : रोटरी क्लब तर्फे कल्हाट येथे जागतिक गिधाड दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.