Pune Crime : पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी विहिरीत अढळले मृतदेह

एमपीसी न्यूज – पुण्यात (Pune Crime) हडपसर व चतःश्रुंगी येथे दोन ठिकाणी विहिरीमध्ये एका तरूण मुलाचा व 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. दोन्ही मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले असून पोलीसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हडपसर येथे साडेसतरा नळी येथील एका विहरीत तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती अग्निशमन दलाला माहिती शनिवारी (दि.3) उशीरा मिळाली. त्यानुसार कारवाई करत हडपसर अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री साडे तीन वाजता मृतदेह बाहेर काढला. मयत मुलाचे नाव शिवाजी सुभाष शेळके (वय 22) असे असून हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची नोंद झाली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

चतःश्रृंगी येथे सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख (Pune Crime) पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि 1) राहूल अण्णाजी काकडे यांनी पोलीसांना खबर दिली, की एका महिलेचा मृतदेह विहिरीत तरंगत आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, त्या महिलेची ओळख किंवा नातावाईक अजूनही पोलिस संपर्कात अद्याप आलेले नाहीत. पोलिसांनी केलेल्या वर्णनानुसार महिला अदांजे 40 वर्षांची असून उंची 5 फूट 4 इंच, रंग गोरा, चेहरा गोल, मजबूत बांधा, अंगात हाफ बाह्यांचा पांढऱ्या रंगाचा त्यावर राखाडी रंगाच्या लाईन असलेला कुर्ता, ग्रे रंगाचा पायजमा, पायात स्पोर्ट शूज व जोडवी असे वर्णन करण्यात आले आहे. तरी संबधित महिलेची माहिती असणाऱ्या त्वरीत पोलिसांशी 020-25655335 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Chakan Water Supply : पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांत संताप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.