Junnar news : खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवले

एमपीसी न्यूज- 25 फुट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवण्यात वन विभाग व वाईल्ड वाईल्ड लाईफ एसओएस च्या पथकांना (Junnar news ) यश आले आहे.
सोमवारी (2 जानेवारी) संध्याकाळी जुन्नर तालुक्यातील इंगळून गावामधील ग्रामस्थान्ना तेथील विहिरीतून विचित्र आवाज ऐकू आला. त्यामुळे ते सर्व जण विहिरी जवळ गेले असता त्यांना विहिरीत एक कोल्हा असल्याचे दिसले. तो कोल्हा पाण्यात पडल्याने स्वतःला वाचवण्यासाठी(Junnar news ) संघर्ष करत होता.
सतर्क ग्रामस्थांनी लगेच वन विभागाला कळवले व त्यांनी जुन्नर जवळील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रामधील वाइल्ड लाईफ एसओएस पथकाला कळवले.

वन विभागाची व वाईल्ड लाईफ एसओएस ची पथके तेथे पोहोचण्यापूर्वी कोल्ह्याने विहिरीतील कपारी मध्ये आसरा घेतला होता. ही पथके तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी कोल्ह्याला वाचवण्यासाठी विहिरी मध्ये पिंजरा सोडला. कोल्हा घाबरत असल्याने तो पिंजऱ्यात जात नव्हता. त्यामुळे वाइल्ड लाईफ एसओएस पथकातील एक सदस्य विहिरीत (Junnar news ) उतरला व त्याने कोल्ह्याला पिंजऱ्यात जाण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर पिंजरा बाहेर काढण्यात आला.
वाईल्ड लाईफ एसओएस च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोल्ह्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यामध्ये तो स्वस्थ असल्याचे समजले. त्यानंतर कोल्ह्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.