Chinchwad News: विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

एमपीसी न्यूज – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, माजी मंत्री दतात्रय भरणे, पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच (Chinchwad News) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आणि कुटुंबियांचे गुरूवारी (दि. 5) सांत्वन केले.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मंगळवारी (3 जानेवारी) रोजी निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय व सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन केले जात आहे.

Junnar news : खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवले

गुरूवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, उमा खापरे, पुणे शहर भाजपचे अध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, जगन्नाथ शेवाळे, विलास लांडे, पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह सर्वांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आणि कुटुंबियांचे (Chinchwad News) सांत्वन केले. घरातील सर्वांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.