Pune Kabbadi Competition: कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त कबड्डी स्पर्धचं आयोजन

एमपीसी न्यूज: कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त कबड्डी दिना बरोबरच राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धचं आयोजन करण्यात आलं आहे. (Pune Kabbadi Competition) श्री शिवछत्रपती क्रिडा संकूल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या सहकार्याने आणि बाणेर- बालेवाडी, सूस व म्हाळुंगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या व बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने पुणे लीग कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल गेल आहे.

 

शुक्रवार दि. 15 जुलै ते शनिवार दि. 23 जुलै 2022 या कालावधीत राज्यस्तरीय निमंत्रीत पुरुष व महिला खुल्या गटाच्या कबड्डी स्पर्धा आणि पुणे लिग कबड्डी स्पर्धा – 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुरुषांचे 16 संघ आणि महिलांचे 16 संघ सहभागी होणार आहेत. पुणे लिग कबड्डी स्पर्धेकरीता पुरुषांचे 8 संघ आणि महिलांचे 6 संघ असे एकूण 46 संघ वरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुणे लीग स्पर्धेत खेळा़डूंची निवड प्रक्रीया पूर्ण झाली आहे.  या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25 लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती आहे.

 

Chakan News: चाकणला गुरांच्या बाजारात प्रचंड पोलीस बंदोबस्त, सोशल माध्यमांतील पोस्टचा परिणाम

सदर स्पर्धेचे अंतीम सामने जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहेत.  दि. 15 जुलै रोजी सायं. 6 वा. कबड्डी दिन, राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा व पुणे लिग कबड्डी या स्पर्धेचे उद्‌घाटन सोहळा होणार आहे.(Pune Kabaadi Competition) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, विधानसभेचे विरोधी पक्षनेते – मा. ना. अजित पवार, क्रीडा संचालक – ओमप्रकाश बकोरिया, खासदार गजानन किर्तीकर, सुनिल तटकरे, आमदार भाई जगताप, आमदार अतुल बेनके, पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकूश काकडे, महाराष्टन् राज्य कबड्डी असोशिएशनचे सरकार्यवाह डॉ. अस्वाद पाटील, खजिनदार – मंगल पांडे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 

 

सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि. 23 जुलै रोजी सायं. 6 वा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या वेळी बाणेर,बालेवाडी,सुस व म्हाळुंगे परिसरातील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, महाराष्टन् राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य बाबुराव चांदेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र आंदेकर, मधुकर नलावडे,वासंती बोर्डे – सातव, शकुंतला खटावकर , सुनील चांदेरे, महादेव कोंढरे दत्तात्रय झिंजुर्डे, दत्तात्रय कळमकर ,डॉ. सागर बालवडकर , पुणे लिग कबड्डी  स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष समीर चांदेरे , नितीन कळमकर , विशाल विधाते मान्यवर उपस्थित होते. पुणे लीग स्पर्धेतील प्रत्येक संघात 15 खेळाडू संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक असे प्रत्येकी 17 जणांचे संघ सहभागी होणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.