Kalewadi : गाडी पार्किंगच्या कारणावरून झाले भांडण; पती-पत्नीला बेदम मारहाण, सात जण अटकेत

एमपीसी न्यूज – गाडी पार्किंगच्या (Kalewadi )कारणावरून झालेल्या भांडणात पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार रविवारी (दि.4) काळेवाडी येथील साई नगरी सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडला.

याप्रकरणी शहाजीराव नानासाहेब चव्हाण (वय 45 रा काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मननकुमार रामेश्वर सिंह, त्यांची 2 मुले, दोन महिला आरोपी. तसेच ब्रिजेशकुमार सिंह, निरू ब्रिजेश कुमार सिंह या सात जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास भरघोस यश – डॉ. नेहा बेलसरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची (Kalewadi) चार चकी गाडी पार्क केली होती. यावेळी पार्किंगच्या कारणावरून आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादी व त्यांची पत्नी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.