Kalewadi News: बिअर शॉपीवर दरोडा; चारजण अटकेत

एमपीसी न्यूज – बी एस बिअर शॉपीवर (Kalewadi News) दरोडा टाकणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली.  ही घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेपाच वाजता काळेवाडी येथे घडली.

रितेश दिनकर ओव्हाळ (वय 22), नंदकिशोर उर्फ बंडू नितीन महाकाल (वय 24), सिद्धार्थ संजय जगताप (वय 19), ऋषिकेश शाम कुडवे (वय 24, सर्व रा. काळेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह ओंकार कल्याण ढवळे (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजी गुरुनाथ साळुंखे (वय 50, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad News: शेजाऱ्याकडे गप्पा मारण्यासाठी जाणे पडले महागात; सव्वालाख रूपये किंमतीचे दागिने चोरीला

फिर्यादी यांची नढेनगरमध्ये बिअर शॉपी (Kalewadi News) आहे. बिअर शॉपीवर येऊन बंडू महाकाल व रितेश ओव्हाळ यांनी ‘आम्ही इथले भाई आहोत. आम्हाला बिअर दे नाहीतर तुला मारून सर्व बिअर शॉपी लुटून नेईल’ असा दम दिला. त्यानंतर बिअर शॉपीमधील अडीच हजारांच्या बियरच्या बाटल्या, टिन, ब्रीझर असा ऐवज दरोडा टाकून जबरदस्तीने नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.