Kalewadi : जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर यश तुमच्या पायावर लोळेल – वीरेंद्र चव्हाण

"माझ्या स्वप्नातील भारत" या विषयावर परिसंवाद

 

एमपीसी न्यूज – परिस्थितीला दोष न देता तिला सामोरे जा. यश जोपर्यंत तुमच्या समोर नमस्तक होऊन तुमच्या पायावर लोळत नाही तोपर्यंत जिद्द-मेहनत, प्रामाणिक प्रयत्न सोडू नका. यशस्वी झाल्यानतर समाजासाठी काम करा, सत्याला न्याय द्या असे आवाहन वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वीरेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.

तापकीरनगर येथील द शिवाजी अकॅडेमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यसेवा-लोकसेवा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझ्या स्वप्नातील भारत” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस दलात अधिकारी बनण्यासाठी करावयाची तयारी या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण बोलत होते. यावेळी नगरसेविका सुजाता पालांडे, ग्रामपंचायत सदस्या पूनम बुचडे, सामाजिक कार्यकर्ते संजय मोरे, प्रा. शुभम ढवळे, गणेश गोरीवले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

चव्हाण म्हणाले,”अभ्यास करताना फोकस असणे गरजेचे आहे, प्रशासनातील आव्हाने जाणून त्यासाठी आवश्यक गुण आतापासूनच मिळवा, नकारात्मक बाबीवर काम करा, वेळेचे योग्य नियोजन करा, सोशल मीडियायापासून दूर रहा, परीक्षेत येणाऱ्या फसव्या प्रश्नांना कल्पकतेने सामोरे जा, शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर जनतेला हवे तेच काम करा, लोकांना न्याय देत त्यांची दुःखे दूर करण्याचे सामर्थ्य ठेवा”

सध्या जनता आणि प्रशासन यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलिसांवर होणारे हल्ले याकडेही त्यांनी लक्ष वेधत सेवेतील काही थरारक आठवणी सांगितल्या तर गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व फी देखील देण्याचे कबूल करत विविध शंकाचे निरसनही केले.

सुजाता पालांडे म्हणाल्या, “अकॅडमीमध्ये मुलींची असणारी वाढती लक्षणीय संख्या महिलांचं प्रशासनातील प्रमाण वाढत असल्याचे द्योतक आहे”

प्रा.शुभम ढवळे यांनी माझ्या स्वनातील भारताची रूपरेषा, सामाजिक क्षेत्रात कशापद्धतीने कामाची वाटचाल करणार याबाबद्दल माहिती दिली. स्वागत प्रा.अमोल शेवाळे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सर्वराज करंडे यांनी केले. आप्पा दुपारगुडे यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश गोरीवले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1