Kalewadi : भीशीचे पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी महिलेला केले बेल्टने मारहाण

एमपीसी न्यूज – भीशीचे पैसे दिले नाहीत म्हणून (Kalewadi) तिघांनी महिलेला बेल्टने मारहाण करत जखमी केले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.29) रात्री काळेवाडी येथे घडला आहे.

या प्रकऱणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सावल तोताणी, मुन्ना तोताणी, गौरव तोताणी (सर्व रा.काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Khed : जमिन मोजणीला विरोध केल्याप्रकरणी आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीशीचे साडे तीन लाख रुपये परत केले (Kalewadi) नाहीत म्हणून फिर्यादीच्या घराखाली येवून गोंधळ घालत खाली बोलावले, खाली येताच फिर्यादीला शिवीगाळ करत जमिनीवर पाडून बेल्टने व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस पुढील काम करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.