Khed : जमिन मोजणीला विरोध केल्याप्रकरणी आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पोलीस बंदोबस्तात (Khed) सुरु असलेल्या जमीन मोजणीला विरोध करत मारामारीची धमकी देणाऱ्या आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 डिसेंबर रोजी खेड जवळील मोई येथे घडली आहे.

याप्रकरणी परिक्षण भूमापक अमोल सुरेश चौधरी (वय 38) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुलाब दशरथ करपे, सचिन तुकाराम गवारी व त्याचे पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCNTDA: अखेर प्राधिकरण बाधितांचा प्रश्न निकाली; 15 दिवसात सव्वासहा टक्के जमीन आणि 2 एफएसआय मिळणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भिमाई अर्जून कळमकर (Khed) तर्फे कुलमुख धारक राजेंद्र अर्जून कळमकर यांच्या जमिन गट नंबर 489 या जमीन गटाची मोजणी करत होते. यावेळी मोजणीचा अर्ज कऱणारे अर्जदार, पोलीस बंदोबस्त असताना देखील आरोपी तेथे आले व त्यांनी जमीन मोजणी प्रक्रीयेला हरकत घेतली. आरोपी हे जमिन गट क्रमांक 489 मधील जमीनधारक आहेत. यावेळी त्यांनी जमीन मोजणी करायची नाही. केली तर आम्ही भांडणे व मारामारी करू अशी धमकी दिली. तसेच, हातात दगड घेऊन भिती दाखवली. त्यामुळे फिर्यादीला मोजणी थांबवावी लागली. यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.