Kartiki Yatra : आळंदीमध्ये श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने कार्तिकी यात्रेला सुरुवात

एमपीसी न्यूज : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेला (Kartiki Yatra) आज सकाळपासून श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास माऊलींच्या समाधी मंदिरापुढील श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. महाद्वारात पायरी पूजनासाठी भाविकांची गर्दी झाली. महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला. पूजेसाठी दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण आणि सोबत ब्रह्मवृदांचा विधिवत अखंड मंत्रोच्चार सुरू झाला.

Velhe NCP : वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बुथ कमिटी आढावा बैठक सपंन्न

साथीला वारकऱ्यांचा माऊली नामाचा अखंड जयघोष सुरु होता. श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफाळकर, ऋषीकेश आरफाळकर यांनी श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीचे पूजन केले. श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पुजेचे पौरोहित्य वेदमूर्ती विजय  कुलकर्णी, अमोल गांधी यांनी केले. यानंतर माऊलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले.

त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी देवस्थान (Kartiki Yatra) प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पा. देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पा. राहूल चिताळकर, पा.स्वपिल कुऱ्हाडे पा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, पो.नाईक मच्छिंद्र शेंडे, राष्ट्रवादी नेते डी डी भोसले पा., नंदकुमार वडगांवकर, सुदीप गरुड, विठ्ठल घुंडरे, आरू इ.मान्यवर व वारकरी भाविक आळंदी ग्रामस्थकर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.