Alandi News : माऊली माऊली च्या जयघोषात संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेची सांगता

एमपीसी न्यूज : 23 नोव्हेंबर रात्री 9: 30 ते 12:30 यावेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा छबिना व पालखी मिरवणूक या कार्यक्रमा निमित्त माऊलींच्या पालखीची शहरात नगरप्रदक्षिणा झाली.टाळ मृदुंगाच्या गजरात,नगारखानाच्या वाद्या समवेत ,फटकाच्या (Alandi News) अतिषबाजीत,माऊली माऊली च्या नामघोषात, हजारो भाविकांच्या उपस्थित माऊलींचा 726 संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेची सांगता झाली.

Indrayani : इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या महिलेचे एनडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण

त्यानंतर मान्यवरांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.(Alandi News) यावेळी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,विश्वस्त विकास ढगे पाटील,व्यस्थापक ज्ञानेश्वर वीर,सोहळा मालक आरफळकर,माऊलीचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील, राहुल चिताळकर पाटील,स्वप्निल कुऱ्हाडे पाटील,योगेश आरु,पो.आ.जालिंदर जाधव ,पाटील साहेब इ.मान्यवर वारकरी भाविक व आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.