Indrayani : इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या महिलेचे एनडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण

एमपीसी न्यूज : आळंदीमधील इंद्रायणी (Indrayani) नदीपात्रात वंदना खोत (वय 45) ही महिला इंद्रायणी नदीमध्ये स्नानासाठी पाण्यात उतरली असता ती नदीपात्रातील पाण्यात बुडाली. दुपारी साडे बाराच्या दरम्यान एनडीआरएफटीम 5 पीने बुडालेल्या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेला तत्काळ बाहेर काढून तिची पाठ दाबून काही प्रमाणात शरीरातून पाणी बाहेर काढले.

एनडीआरएफच्या टीम सोबत मदतीला पोलीस कर्मचारी होते. तत्काळ रुग्णवाहिकेला बोलवण्यात आले. रुग्णवाहिका नदीपलीकडील दर्शनबारी समोर उभी करण्यात आली होती. एनडीआरएफ टीम व पोलीस कर्मचारी यांनी स्ट्रेचरवर तिला रुग्णवाहिकेत पोहचवले. थोडीशी शुद्ध व घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेला एनडीआरएफ जवान व पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत एनडीआरएफ टीम 5 पी यांनी माहिती दिली.

Talegaon Dabhade : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

एनडीआरएफ टीम विजय मस्के, नवनाथ मिडगुले, संतोष हिरवे, कैलास कोकटे, गणेश धोंडे, धिरेंदर सिंग यांनी त्या महिलेचे प्राण वाचवले. महिलेला त्या अवस्थेत रुग्णालयात आणल्यानंतर उर्वरित (Indrayani) राहिलेले (नाका तोंडाद्वारे शरीरात गेलेले पाणी) शरीरातील पाणी आळंदी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी काढले. त्या महिलेवर योग्य ते उपचार केले गेले आहेत व अजूनही चालू आहेत. तिची तब्येत ठिक आहे.

तिचे मूळ गाव सांगली असून ती मुबंईला राहते. तीला दोन मुले आहेत. तिच्या मुलाचा मित्र सतीश मोरे हा रुग्णालयात येऊन तिला तब्येतीची विचारपूस करून भेट देऊन गेला आहे. तिचा मुलगा योगेश खोत आळंदीला तिला गावी नेण्यासाठी येणार आहे. याबाबतची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.ऊर्मिला शिंदे यांनी दिली. या घटनेची माहिती कळताच मुख्याधिकारी अंकुश जाधव व पालिका अधिकारी वर्ग किशोर तरकासे,अक्षय शिरगिरे यांनी ग्रामीण रुग्णालयात त्या महिलेच्या तब्येतीची विचारपूस केली व तिची भेट घेतली. ती महिला घडलेल्या प्रसंगाने घाबरलेल्या अवस्थेतच दिसून येत होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.