Velhe NCP : वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बुथ कमिटी आढावा बैठक सपंन्न

एमपीसी न्यूज : वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Velhe NCP) या पार्टीची बुथ कमिटी आढावा बैठक बालाजी रिसॉर्ट या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीचे उत्तम नियोजन वेल्हे तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष संतोषभाऊ रेणुसे व त्यांचे सहकारी यांनी केले. या बैठकीला बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 13 – क्रिकेटपटू अमोल मजूमदार

पुणे जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या, कात्रज, कार्यश्रम विद्यमान संचालक भगवानबापू पासलकर, तालुका वेल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, अध्यक्ष शंकरराव भुरूक, तानाजी मांगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष किरण राऊत, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष देशमुख, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक आघाडीचे अध्यक्ष प्रमोद लोहकरे, सभापती संगीता जेधे, तसेच वेल्हे तालुक्यातील एकूण 95 बुथ अध्यक्षापैकी 100 टक्के अध्यक्ष उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे तालुका (Velhe NCP) पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या सेलच्या पदाधिकारी, युवक आघाडीचे पदाधिकारी, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुका वि.का.सोसाचे अध्यक्ष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.