Kasarwadi Crime News : वीजबिल थकले सांगत लुबाडले साडेनऊ लाख

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएसईबी) मधून बोलत (Kasarwadi Crime News) असल्याचे म्हणत बिल थकल्याचा बहाणा करून एका व्यक्तीची नऊ लाख 51 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 24) सायंकाळी कासारवाडी येथे एका कंपनीत घडला.

नानासाहेब निवृत्ती जगताप (वय 56, रा. हिंगणे, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन मोबाईल क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kasba Peth, Chinchwad Bye Election: मतदानाच्या तारखेत बदल, आता ‘या’ तारखेला मतदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप हे कासारवाडी येथील एका कंपनीत काम करत असताना त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने ती एमएसबी मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले. जगताप यांचे वीजबिल थकले आहे, ते अपडेट करण्यासाठी काही प्रक्रिया आहे, असे सांगत आरोपीने जगताप यांना विश्वासात घेतले. थकलेले वीजबिल अपडेट करण्यासाठी एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक केली असता जगताप यांच्या बँक खात्यातून नऊ लाख 51 हजार रुपये ट्रान्सफर झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

मात्र महावितरण असा कोणताही फोन करून वीजबिल मागत नाही ऑनलाईन वीजबिल भरणा देखील महावितरण च्या अधिकृत साईट वरूनच होतो त्यामुळे नागरिकांनी आशा फोन (Kasarwadi Crime News) कॉल ला बळी पडू नये असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.