Kasba Peth, Chinchwad Bye Election: मतदानाच्या तारखेत बदल, आता ‘या’ तारखेला मतदान

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या तारखेत बदल झाला आहे. आता 27 (सोमवार) ऐवजी 26 (रविवार) फेब्रुवारी रोजी मतदान (Kasba Peth, Chinchwad Bye Election) होणार आहे. बारावीच्या परीक्षेमुळे तारखांमध्ये बदल झाला आहे. निकाल 2 मार्च रोजीच लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा बदल केला आहे.

पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागी 18 जानेवारी रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. पण, मतदानादिवशी सोमवार येत होता. त्यादिवशी बारावीची परीक्षा असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार मतदानाच्या तारखेत बदल करुन एकदिवस अगोदर म्हणजे 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

Pimpri News : भारत विकास परिषदतर्फे हिवाळी आरोग्य तपासणी शिबिर

या निवडणूकीसाठीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारी अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीचा (Kasba Peth, Chinchwad Bye Election) निकाल 2 मार्च रोजी जाहीर होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.