Chinchwad Bye Election: पोटनिवडणुकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले…

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे (Chinchwad Bye Election) विधान केले आहे. चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवावा, अशी आमची भूमिका असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर ठाकरे गट चिंचवडच्या जागेसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडी एकत्र लढते की स्वतंत्र लढते, एकत्रित लढल्यास मतदारसंघ कोणाला सुटतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली असून 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 31 जानेवारीपासून अर्ज भरता येणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Kasba Peth, Chinchwad Bye Election: मतदानाच्या तारखेत बदल, आता ‘या’ तारखेला मतदान

चिंचवडची जागा लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कमालीचे आग्रही आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्यही आहे. तसेच ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेसनेही चिंचवडच्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणाला जागा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान समोर आले आहे.

कसबा आणि चिंचवड या मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवावा, अशी आमची भूमिका असल्याचे ठाकरे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नांदेड,पंढरपूर, कोल्हापूर पोटनिवडणुकीचे उदाहरण देत या निवडणुका बिनविरोध होणार नसल्याचे राऊत (Chinchwad Bye Election) यांनी सांगितले.

दरम्यान, ठाकरे यांच्या शिवसेनेला जागा सुटल्यास मागीलवेळी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांची उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.