Kasarwadi : केशवनगरमध्ये गॅस गळतीनंतर झालेल्या स्फोटात 5 जण जखमी

एमपीसी न्यूज- घरगुती सिलेंडर मधून गॅस गळती होऊन त्यानंतर झालेल्या स्फोटामध्ये तीन चिमुकल्यांसह पाच जण जखमी झाले. ही घटना आज (सोमवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास कासारवाडी मधील केशवनगर येथे घडली.

शोभा बिरादार (वय 30), गणेश बिरादार (वय 8), शुभम बिरादार (वय 5), देवांश बिरादार (वय 3), विजय जाधव. (वय 22) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कासारवाडी केशवनगर येथील गुरुनाथ कॉलनी येथे आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संत तुकारामनगर आणि भोसरी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने आग लागल्याचे समजले आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.