Kasarwadi News : युवा सेनेच्यावतीने महिला डॉक्टर, परिचारिकांचा गौरव

एमपीसीन्यूज : जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी युवासेना व सुलभाताई उबाळे सोशल फॉउंडेशनच्यावतीने फुगेवाडी -दापोडी- कासारवाडी येथील महिला डॉक्टर आणि परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.

युवा सेना पिंपरी विधानसभा संघटक निलेश हाके यांच्याहस्ते महापालिका रुग्णालयात जाऊन महिला डॉक्टर आणि परिचारिकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

या प्रसंगी डॉ. अल्वी, राजेंद्र ताजने, बुद्धीसागर गायकवाड, अविनाश जाधव, शंकर शेंडगे, मंजुळा इंगळे, भाग्यश्री कोठेकर, अंजली नेवासकर, ज्योती परीट आदी उपस्थित होते.

कार्यक्रमचे आयोजन पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.