Kasarwadi: महापालिकेचा नवीन दवाखाना सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 मधील कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील नवीन दवाखान्याचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (गुरुवारी) उद्‌घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्य शाम लांडे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा शिलवंत – धर, स्वीकृत सदस्य माऊली थोरात, प्रभागाचे नामनिर्देशित सदस्य कुणाल लांडगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, डॉ. वैभव सावळे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, कार्यकारी अभियंता केशवकुमार फुटाणे, प्रशासन अधिकारी वामन नेमाणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, उपअभियंता विजय भोसले माहिती व जनसंर्क विभागाचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जवळकर उपस्थित होते.

  • महापालिकेची शहरात एकूण आठ रुग्णालये व 27 दवाखाने कार्यरत आहेत. शहरातील नागरिकांना या दवाखान्यांमध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा सुविधा पुरविल्या जातात. आज सुरु झालेला कासारवाडीतील हा 28 वा दवाखाना असून या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत बाहयरुग्ण सेवा पुरविली जाईल. तसेच दर शनिवारी सकाळी 8 ते सकाळी 10.30 या वेळेत ज्येष्ठ नागरीक, अल्प उत्पन्नधारक, दिव्यांग नागरीक यांच्याकरीता मोफत औषधोपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

    मोफत औषधोपचार घेण्यासाठी आलेल्या नागरीकांनी रेशनकार्ड, दिव्यांग दाखला, आधारकार्ड अशी अनुषंगिक कागदपत्रे सोबत घेउन येणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त विविध प्रकारचे लसीकरण, गर्भवती महिलांसाठी  औषधोपचारासह विविध सेवाही या दवाखान्यातून पूरविण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.