Chinchwad: अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणावर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण निर्मूलन विभागाने चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली. आज (गुरुवारी) केलेल्या कारवाईत 30 झोपडपट्या, दहा दुकाने आणि हरित पट्यामधील 15 बांधकामे भुईसपाट केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

चिंचवड परिसरात अनधिकृत बांधकामे, पत्राशेड थाटली होती. त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज धडक कारवाई केली. मोरया हॉस्पीटल, चिंचवड, कमला कॉर्नर परिसरातील दहा दुकाने, हॉटेल रिव्हर जवळील, विसर्जन घाट परिसरातील 30 झोपडपट्या काढण्यात आल्या. त्याचबरोबर वाल्हेकरवाडीतील हरित पट्यामधील 15 अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली.

दरम्यान, चिंचवड परिसरातील अनधिकृत फलकांवर देखील कारवाई करण्यात आली. दोन जेसीबी, एक पोकलेन, 15 मजूर यांच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.