BNR-HDR-TOP-Mobile

Kasarwadi: पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांची पार्थ पवारांकडून मनधरणी

3,107
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नाराज होऊन पक्षांतर केलेल्या पिंपरी-चिंचवड पदाधिका-यांची मावळचे उमेदवार पार्थ पवार भेट घेऊन मनधरणी करत आहे. त्यांची नाराजी दूर करत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शेकाप महाआघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी आज निगडी, काळभोरनगर, एमआयडीसी, कासारवाडी, कुंदनगर, गंगानगर, लालटोपीनगर आदी परिसरातील नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली. संदीप बेलसरे यांच्या घरी त्यांनी आज भेट दिली.

सुरेखा लांडगे या राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. तसेच किरण मोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर, संदीप बेलसरे यांनी पक्षावर नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न आज पार्थ पवारांनी घरोघरी जाऊन केले. लघुउद्योजकांचे प्रश्न, आतापर्यंत केलेली आंदोलने, वीजदरवाढ आदी विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी लघुउद्योजकांच्या समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, विशाल काळभोर, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.

यावेळी संदीप बेलसरे यांनी लघुउद्योजकांचे प्रश्न सोडवावेत. वीजदरवाढ कमी करावी, अशी मागणी पार्थ पवार यांच्याकडे केली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.