Khadki Crime News : दुचाकी घसरून खाली पडल्याने  तरुणाचा मृत्यू

एमपीसीन्यूज  : खडकी परिसरात भरधाव  दुचाकी घसरून खाली पडल्याने दुचाकीस्वार तरुणाच्या छाती आणि पोटाला जबर मार लागला. या तरुणावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 21 मार्च रोजी हा अपघात झाला. 

राजेंद्र चंद्रभान आव्हाड (वय 29, रा. पिंपळे गुरव), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी,  21 मार्च रोजी राजेंद्र आव्हाड हे खडकी परिसरातील सेंट जोसेफ स्कूल समोरून जात होते. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची

. यामध्ये त्यांच्या छातीला आणि पोटाला जबर दुखापत झाली होती.

ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.