Khandala : खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

एमपीसी न्यूज – खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा उदघाटन समारंभ आज (सोमवारी) पार पाडला. या इमारतीचे बांधकाम पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांनी केले आहे. या इमारतीमध्ये विद्यासंकुल आणि प्रशिक्षणार्थींच्या वसतिगृह आहे.

उदघाटन समारंभासाठी पोलीस आयुक्त (पुणे) के व्यंकटेशम, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय सक्सेना, भारतीय नौदलाचे श्रीनिवासन कमोडोर, पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) संदीप पाटील, महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, भारतीय नौदलाचे कॅप्टन बलीअप्पा, लेफ्टनंट कमांडर अनस रेहमान, आदिती पडसलगीकर, अलका सक्सेना आदी उपस्थित होते.

पोलीस महासंचालक दत्ता पडसलीगकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळाच्या प्राचार्या स्मिता पाटील यांनी केले. तर उपप्राचार्य आर आर पोवार यांनी आभार मानले. या इमारतीमध्ये संगणक कक्ष, जिम्नॅशियम हॉल, सेमिनार हॉल, सिम्युलेटर रूम, डिजिटल लायब्ररी आदी सुविधा आहेत. ज्ञानप्रकाश विद्यासंकुल मध्ये सहा वर्गखोल्या असून प्रत्येक वर्गखोली मध्ये 40 प्रशिक्षणार्थींच्या क्षमता आहे. त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाई हे 200 प्रशिक्षणार्थी क्षमतेचे वसतिगृह आहे. यामध्ये स्टडी रूम, वाचनालय आदी सुविधा आहेत. यापूर्वी या प्रशिक्षण केंद्रात 480 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत होते. राणी लक्ष्मीबाई वस्तीगृहामुळे ही क्षमता 680 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.