Khed : आधी पार्थ पवारांना निवडून आणा, मग बाकी गप्पा मारा; अजित पवार यांना विकास लवांडे यांचे आव्हान

एमपीसी न्यूज – आधी पार्थ पवारांना मावळ लोकसभा मतदारसंघातून (Khed) निवडून आणा, मग बाकी गप्पा मारा, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी अजित पवार यांना दिले आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणारच असा निर्धार अजित पवार यांनी केला. त्यांच्या या विधानाचा लवांडे यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला.

अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान देताना म्हटले होते की, मी स्वतः आणि दिलीप वळसे पाटील यांनी कष्ट केल्यामुळे अमोल कोल्हे विजयी झाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्याला आता विकास लवांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Chakan : पिकपअपच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू; पिकअप चालकाला अटक

कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा ( शरद पवार गट ) शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु झाला आहे. यावेळी पुणे जिल्ह्यातील खेड येथे सभा पार पाडली. अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजून तुमचा उमेदवार फिक्स झाला नाही. अजितदादा तुम्ही म्हणालात ना दिलीप वळसे पाटील यांनी कष्ट केले (Khed) म्हणून अमोल कोल्हे विजयी झाले तर आता तुम्ही दिलीप वळसे पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करा, मग आपण पाहूच काय होतंय. असेल हिम्मत तर लढाच, अशाप्रकारे थेट आव्हान देण्यात आल्याने आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यामध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.