Chakan : पिकपअपच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू; पिकअप चालकाला अटक

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणाऱ्या शेतकऱ्याला पिकअपने जोरदार (Chakan) धडक दिली. या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.26) रात्री चाकण ते शिक्रापूर महामार्गावर भोसे गाव येथे घडला.

मल्हारी गोविंद गाडेकर (वय 48, भोसे) असे शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी चाकण पोलिसांनी सुनील संजय इंगळे (वय 23, बुलढाणा) याला अटक केली आहे,  याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात शरद अंकुश गाडेकर (वय 28, भोसेगाव ) यांनी फिर्यादी दिली आहे.

Maval : बाळराजे असवले इंग्लिश स्कूल व सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मल्हारी हे शेतीची कामे करून घराकडे पायी चालत जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील पिकअप भरधाव वेगाने  चालवून (Chakan) मल्हारी यांना  धडक दिली. यामध्ये मल्हारी हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी चालकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.