Maval : बाळराजे असवले इंग्लिश स्कूल व सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे (Maval) बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल व सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पाडले. अंदर मावळ भागातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून या शाळेची ओळख आहे. अंदर मावळ परिसरातील सुमारे 18 गावातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.

अंदर मावळ भागातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल व सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल मधील वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेस्टँम्प कंपनीचे विभागीय संचालक शरद गेहलोत,कायनेटिक टायिझिंग कंपनीचे प्रमुख व्यवसाय विकास अधिकारी (Maval) गौतम लोढा, गेस्टँम्प कंपनीचे गटप्रमुख संतोष चव्हाण,मा उपसरपंच दत्ता असवले, अनिल मालपोटे,रुपेश घोजगे,नामदेव कोंडे,विजय सातकर,विकास आसवले,गजानन खरमारे,नारायण ठाकर,नामदेव शेलार,दत्ता असवले, प्रिया मालपोटे,ज्योती आंबेकर, प्रकाश मालपोटे,रवी पवार,रामनाथ असवले,दशरथ जांभुळकर, सागर म्हाळसकर,शेखर मालपोटे,आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

2007 साली शाळेची सुरूवात केली. ग्रामीण भागातील मुले इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी येतात.इयत्ता दहावीच्या पाच बॅचेस उत्तीर्ण होऊन गेल्या.
या स्कूलमध्ये टाकवे,फळणे,खांडी, सावळा,वाहनगाव,वडेश्वर,माऊ, कशाळ,कल्हाट,पवळेवाडी,किवळे, बेलज,राजपुरी,घोनशेत, कचरेवाडी, साई,नानवली, पारवडी अशा अनेक ग्रामीण भागातून विद्यार्थी या स्कूलमध्ये येत आहेत विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणहून येतात शेतकरी कुटूबियांतील तरूणांनी शाळा सुरू केली.कमीत कमी डोनेशन घेतले जाते.माफक फी आहे.वेगवेगळे उपक्रम असतात दरवर्षी शाळेचा निकाल 100 टक्के असतो.

Pune : पुणे-नाशिक महामार्गावर बिबट्या क्रॉसिंग फलक लावण्यास सुरुवात

विद्यार्थाना मोठी स्वप्नं राबविण्याचा आत्मविश्वास येथे पहायला मिळतो. या स्कूल मधून अनेक विद्यार्थी वकील,डी फार्मसी,इंजिनियर झाले अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चिंधु असवले व सचिव रामदास जाखोबा वाडेकर यांनी दिली.

उपस्थित संचालक मंडळ तानाजी असवले खजिनदार,उपाध्यक्ष मनोज जैन, संचालक भूषण असवले,पांडुरंग मोढवे, राज खांडभोर,स्वामी जगताप, दत्ता गायकवाड, लक्ष्मण कुटे, कार्यक्रमाचे नियोजन प्रिन्सिपल राज कांबळे सर व व्हाईस प्रिन्सिपल प्रियांका कुडे व सर्व शिक्षक स्टाफ यांनी केलं. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी केले.प्रास्ताविक संचालक राज खांडभोर यांनी केले व आभार रामदास वाडेकर यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.