Mahavitaran : विजयस्तंभ परिसरात महावितरणची यंत्रणा सज्ज

एमपीसी न्यूज – शौर्य दिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभास  (Mahavitaran) मानवंदना देण्यासाठी लाखो नागरिक कोरगाव भिमा येथे येणार आहेत. या कार्यक्रमात महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा व वीजसुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच सुरळीत वीजसेवा देण्यासाठी 35 अभियंते व जनमित्रांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी गुरूवारी (दि. 28) विजयस्तंभ परिसरातील वीजपुरवठा व सुरक्षेसाठी केलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता माणिक राठोड, उपकार्यकारी अभियंता विजय जाधव आदींची उपस्थिती होती.

पेरणे परिसरात अत्यंत गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सात रोहित्रांना वीजसुरक्षेसाठी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकपासून तयार केलेले नव्या तंत्राचे मजबूत व टिकाऊ संरक्षक जाळ्यांचे कुंपण लावण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या 11 लाख 82 हजार रुपयांच्या निधीतून पेरणे येथे दोन रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात आली असून जुन्या वीजतारा बदलण्यात आल्या आहेत.

Khed : आधी पार्थ पवारांना निवडून आणा, मग बाकी गप्पा मारा; अजित पवार यांना विकास लवांडे यांचे आव्हान

विजयस्तंभ परिसरातील 11 वितरण पेट्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. लघुदाब वीजवाहिन्यांना ३१ ठिकाणी स्पेसर्स बसविण्यात आले आहे. तसेच परिसरातील संपूर्ण वीजयंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे व सुरक्षा उपायांचे काम पूर्ण झाले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध स्टॉल्स, वैद्यकीय सोयी व इतर ठिकाणी मागेल त्यांना तात्पुरती नवीन वीजजोडणी तात्काळ देण्याचे काम सुरु आहे.

यासोबतच विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी सुरळीत वीजपुरवठा व ग्राहकसेवा (Mahavitaran) देण्यासाठी वरिष्ठ अभियंत्यांसह सहायक अभियंता कैलास कांबळे व दीपक बाबर यांच्यासह 30 जनमित्रांची बुधवार (दि. 27) ते सोमवारी (दि.1) कार्यक्रम संपेपर्यंत विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.