Khed : राजगुरूनगर मध्ये होणार मनोज जरांगे पाटील यांची सभा

एमपीसी न्यूज – जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे लाखोंची सभा (Khed) घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यात सभा होणार आहे. खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे येत्या शुक्रवारी (दि. 20) होणाऱ्या सभेची जंगी तयारी आयोजकांनी सुरु केली आहे.

शनिवारी जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मराठा समाजाची सभा (Khed) घेतली. या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले होते. या सभेत जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाच्या बाबतीत 10 दिवसांचा अल्टीमेटम दिला. एक ऑक्टोबर पासून येथे सुरु असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ते ही सभा घेणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले.

Pune Metro : पेमेंटच्या ऑनलाईन कटकटीला ‘मेट्रो कार्ड’ उत्तम पर्याय

आता राज्य सरकारकडे दहा दिवस उरले आहेत. त्यांनी या दहा दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा 22 ऑक्टोबरला आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी शनिवारच्या सभेत दिला आहे. त्यामुळे राजगुरूनगर येथे होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.