Pashan : हॉटेलच्या स्मोकिंग झोनमधून मुलांना बाहेर पाठवल्याने एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलच्या स्मोकिंग झोन मध्ये धुम्रपान करण्यासाठी गेलेल्या ( Pashan ) ग्राहकाने तिथे खेळत असलेल्या लहान मुलांना वेटरला सांगून बाहेर पाठवले. या कारणावरून मुलांच्या पालकांनी त्या व्यक्तीस बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री पावणे दहा वाजता सुतारवाडी पाषाण येथील पंजाबिझ हॉटेल येथे घडली.
निरंजन संजीवन हर्षे (वय 42, रा. औंध, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील शंकर बिराजदार (वय 40, रा. वाकड), श्लोक सुदेश होणराव (वय 27, रा. वडगाव, पुणे), सिद्धार्थ संतोष होणराव (वय 36, रा. गुलटेकडी), सम्राट सतीश होणराव (वय 34, रा. गुलटेकडी), शंतनू संदीप होणराव (वय 31, रा. स्वारगेट), इतर दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षे हे त्यांची मैत्रीण आणि पत्नीसोबत ( Pashan )पाषाण येथील पंजाबिझ हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले. जेवण करण्यापूर्वी ते हॉटेल मधील स्मोकिंग झोन मध्ये सिगारेट पिण्यासाठी गेले.
त्यावेळी तिथे लहान मुले खेळत होती. त्यामुळे हर्षे यांनी वेटरला आवाज देऊन लहान मुलांना बाहेर पाठवले. त्यानंतर मुलांचे पालक आरोपी आले. त्यांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हर्षे यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांना धक्का दिला. हर्षे यांच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. तसेच हर्षे यांच्या मित्राच्या डोक्यात मारून दुखापत केली.
त्यानंतर हर्षे यांना ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास ( Pashan ) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.