Pune Metro : पेमेंटच्या ऑनलाईन कटकटीला ‘मेट्रो कार्ड’ उत्तम पर्याय

एमपीसी न्यूज – मेट्रोने प्रवास करते वेळेस (Pune Metro) तिकीट काढताना ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन तिकीट काढताना प्रवाशांना काही वेळेला तांत्रिक अडचणी येतात. ऑनलाईन तिकीट न काढता कॅशलेस मेट्रो प्रवास करायचा असेल तर ‘मेट्रो कार्ड’ हा त्यावरील उत्तम पर्याय आहे.

महामेट्रोने मेट्रो तिकिटासाठी व्हाटस अप तिकीट हा नवा पर्याय सुरु केला. कॅशलेस, पेपरलेस मेट्रो प्रवासासाठी असाच आणखी एक पर्याय मेट्रोने उपलब्ध करून दिला आहे. तो म्हणजे ‘मेट्रो कार्ड’. काही प्रवाशांना व्हाटसअप वरून तिकीट काढताना तांत्रिक अडचणी येतात. बँक खात्यातून पैसे कट होतात. मात्र तिकीट येत नाही. ऑनलाईन पेमेंट करताना देखील पेमेंट होते मात्र तिकीट मिळत नाही. अशा अडचणींमध्ये कॅशलेस प्रवास करण्यासाठी मेट्रो कार्ड उपयोगी ठरत आहे.

महामेट्रोने एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी करून ही सेवा सुरु केली आहे. हे कार्ड बहुद्देशीय कार्ड आहे. पुणे मेट्रोसह भारतात कुठलेही रिटेल पेमेंट करण्यासाठी हे कार्ड वापरले जाऊ शकते. भारतातील कुठल्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये हे कार्ड वापरता येईल.

तर हे कार्ड आपला एटीएम कार्ड प्रमाणे आहे. त्याला आपल्याला युपीआयवरून पेमेंट करून रिचार्ज करावे लागेल. आपल्या सोयीनुसार आपण त्यात पैसे ठेऊ शकतो. पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानकावरून एखादा प्रवासी पुणे रेल्वे स्टेशन येथे निघाला आणि प्रवासातच त्याला खडकी येथे उतरावे लागले तर त्याचे जेवढ्या मार्गावरून प्रवास केला आहे, तेवढ्याच मार्गाचे तिकीट मेट्रो कार्डमधून कापले जाईल. मेट्रोच्या फलाटावर प्रवेश करतेवेळी आणि फलाटावरून बाहेर पडतेवेळी हे कार्ड स्कॅन करावे लागते. त्यानंतर तुम्ही किती प्रवास केला हे मोजून त्यातून पैसे कट होतात.

सर्व मेट्रो स्थानकांवर हे कार्ड उपलब्ध आहे. हे कार्ड वापरताना पाच हजार रुपयांपर्यंतच्या एकल व्यवहारासाठी कोणत्याही (Pune Metro) पिनची आवश्यकता नाही. तसेच या कार्डचा उपयोग करून प्रवास केल्यास तिकिटात 10 टक्के सवलत देखील आहे. त्यामुळे या कार्डचा उपयोग करण्याचे आवाहन मेट्रो कडून केले जात आहे.

Talawade : ही कोंडी कधी सुटणार? तळवडे परिसरातील नागरिकांचा संतप्त सवाल

मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, “ऑनलाईन पेमेंटच्या प्रक्रियेत महामेट्रो, बँक आणि थर्ड पार्टी अशा तीन सर्व्हरचा उपयोग होतो. त्यापैकी एखाद्या जरी सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण आली तर प्रवाशांच्या बँक खात्यातून पैसे कट होतात. मात्र त्यांना तिकीट मिळत नाही. या तांत्रिक बाबी सोडविण्यासाठी आम्ही युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहोत. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

youtube.com/watch?v=AEKvv0Pxaug

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.