Khed : कोयाळी येथे देव-दानव युद्धाचा थरार

एमपीसी न्यूज : श्री क्षेत्र कोयाळी भानोबाची (Khed) येथे श्री भानोबाचा उत्सव व यात्रेनिमित्त हजारो भक्त भाविकांनी देव दानव युद्धाचा थरार अनुभवला. पूर्वी शिवभक्त भानोबा देवाला कपट करून तस्करांनी मारले होते. एक दिवस माझ्यासाठी तुम्हाला मरावं लागेल, असा शाप त्यावेळी श्री भानोबा देवाने त्यांना दिला होता. त्यामुळे श्री भानोबा देवाच्या शापानुसार तस्करांना आजही देवाशी युद्ध करावे लागत असल्याचे येथे दिसून येत आहे.

24 नोव्हेंबर रोजी कोयाळी यात्रेच्या पहिल्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात श्री भानोबा (राहुटी) मंदिरापासून देव दानवांच्या युद्धाला सुरुवात झाली. भानोबा देव (जन्मस्थ) मंदिराकडे प्रस्थान करत असताना त्यांच्या समोर (मानवी रुपी तस्कर) दानवांनी आपली हातातील शस्त्र (काठी) देवासमोर फिरवून त्यांनी उड्या घेतल्या. मात्र, देवाच्या (देवाचा मुखवटावर घेतलेल्या) नजरेला नजर पडल्यानंतर ते त्याक्षणी जमिनीवर कोसळतात.

जन्मस्थ मंदिर परिसरापर्यंत हे युद्ध खेळले गेले. युद्ध खेळते वेळी जमिनीवर कोसळणाऱ्या सर्व तस्करांना येथील जन्मस्थ मंदिरासमोर उचलून आणून पाठ वर व पोट खाली करून जमिनीवर रांगेत ठेवले जाते. त्यानंतर श्रीं भानोबाचा त्यांना स्पर्श दिला गेला. श्रींचे तीर्थजल त्यांच्यावर शिंपडले जाते. त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात (भानोबाच्या नावानं चांगभलं) भानोबाचा जयघोष करून त्यांना शुद्धीवर आणले.

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांनी रिक्षा चालकांना लुटणाऱ्या टोळीला केली अटक

25 नोव्हेंबर रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा दुपारी (Khed) बारा वाजता देव दानव युद्ध जन्मस्थ मंदिरा समोर खेळले जाणार आहे. कोयाळी श्री भानोबा उत्सव व यात्रा 3 दिवस चालते. पहिल्या व दुसऱ्या दिवशी देव दानव युद्ध खेळले जाते. ते पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.